विशेष प्रतिनिधी
Mumbai News : कुणाल कामराला तामिळनाडूमध्ये कितीही संरक्षण असलं तरी जेव्हा मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू, ही धमकी नाही, तर आपल्याकडे अथिती देवो भवची संस्कृती आहे. घाबरण्याचं कारण नाही, कुणाल कामराने कायदेशीर प्रक्रियेला सामाेरे जावे असा इशारा राहुल कनाल यांनी म्हटले आहे.
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी तो वादात अडकला आहे. कुणाल कामराच्या या गाण्यानंतर त्याच्याविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यानंतर कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवेसनेच्या (शिंदे) नेत्यांकडून कुणाल कामराला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, यानंतर कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने अटपूर्व जामीन अर्ज मंजूर करत दिलासा दिला.
पोलिसांनी कुणाल कामराला दोनवेळा चौकशीसाठी समन्स देखील बजावले आहेत. पण अद्याप कुणाल कामरा चौकशीसाठी हजर झालेला नाही. असं असतानाच आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांनी कुणाल कामराला इशारा दिला आहे.
कुणाल कामराबाबत बोलताना राहुल कनाल यांनी काय म्हटलं की, “कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करून युवा सेनेचे सदस्य दर सोमवार आणि गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी येतात. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. न्यायालयाने कुणाल कामराला दिलासा दिला आहे. मात्र, तो दिलासा ७ एप्रिलपर्यंत आहे. कुणाल कामराने कायदेशीर प्रक्रियेला सामोर जावं”, असं राहुल कनाल यांनी म्हटलं.
स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने आपल्या शोमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती. यामध्ये कुणाल कामराने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीचा संदर्भ दिला होता. यामध्ये कुणाल कामरा शोमध्ये म्हटलं होतं की, “महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे, त्यांना सांगावं लागेल. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली”, असं म्हणत कुणाल कामराने शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणंही सादर केलं होतं. मात्र, व्यंगात्मक गाणं सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रमस्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच कुणाल कामराच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.
Shiv Sena will welcome in style when it comes to Mumbai…Rahul Kanal’s warning to Kunal Kamra
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला