Raj Thackeray निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या हाती एक सुसंस्कृत राज्य आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. मराठी माणसासाठी जर चांगल्या गोष्टी करणार असाल तर आमचा तुम्हाला निश्चितपणे पाठिंबा आहे. पण प्रत्येक गोष्ट आमचं ऐकून करा अशी अट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे.Raj Thackeray
सध्या महाराष्ट्रात सगळेच पक्ष महापालिका निवडणुकांची तयारी करत आहेत. अशातच राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याची भाषा गुढीपाडवा मेळाव्यातून केली आहे. यामुळे अनेकांना मागच्या वर्षी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्याची आठवण आली आहे. राज ठाकरेंनी त्यावेळी झालेल्या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता महापालिकेत भाजप महायुतीसह मनसेही येणार का? असा प्रश्न चर्चिला जाण्याची शक्यता आहे.
औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “औरंगजेबाच्या कबरीभोवतीची सजावट काढून टाका. त्या ठिकाणी फक्त कबर दिसली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक मोठा फलक लावा. आम्हा मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला. हा आमचा इतिहास आहे. शाळेतल्या मुलांना सहलीला नेऊन त्यांना हा इतिहास दाखवा”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
अफझल खान प्रतापगडावर आला होता. त्याला पायथ्याशीच पुरला. ‘पुरुन उरेन’ हा शब्द याच कृतीतून आला आहे. अफझल खानाची कबर महाराजांना विचारल्याशिवाय बांधली गेली? शक्यच नाही. त्यांनी सांगितलंच असणार की अफझल खानाची कबर नक्की बांधा. ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करुन चालणार नाही. जगाला दाखवलं पाहिजे आम्ही यांना गाडलं आहे. शाळकरी मुलांना सहलीला नेऊन तो इतिहास दाखवला पाहिजे. असंही राज ठाकरे म्हणाले.
Supports but you listen to us, Raj Thackeray’s condition to Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला