विशेष प्रतिनिधी
पुणे : Supriya Sule आमचे वाल्मिक कराड सोबत संबंध होते. ते आम्ही कधीच नाकारले नाही. एकाच पक्षात होतो. आमच्यासोबत पक्षात होते तेव्हा फोटो असणारच, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
बीड प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या, उशिरा का होईना आरोपींना अटक झाली.पुण्यातून अटक कशी होते? पोलिस यंत्रणेने एक ऑफिशियल स्टेटमेंट काढावे. दिल्लीत ही या केसची चर्चा आहे. अनेक जण विचारतात असतात. त्यामुळे- महाराष्ट्र सरकारने ऑफिशियल आणि खरं स्टेटमेंट काढावं.
बीड आणि परभणी प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून पारदर्शक कारभार करावा एवढीच सरकार कडून अपेक्षा आहे संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणांमध्ये निर्णय घ्यावा
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे परभणी आणि बीड प्रकरणात न्याय दिला पाहिजे. संवेदनशीलपणा दाखवावा. राजकारण बाजूला ठेवून कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री नेमले जात नसल्याबद्दल टीका करताना त्या म्हणाल्या,निवडून आल्यानंतर सरकार बसलं. सरकारची जबाबदारी आहे. पण पालकमंत्र्यांची चर्चा पहिल्यांदाच मी ऐकते आहे. मी अनेक वर्षे सत्तेच्या जवळ राहिलेले आहे. पण पालकमंत्री असणं काय आहे काय माहिती? हे राज्याचे हिताचे नाही. राज्याच हित राजकारणाबाहेर जाऊन असलं पाहिजे. एवढं मोठं बहुमत मिळालं आहे.तरीही सगळ्यात गोष्टी उशिरा होत आहे. अनेक मंत्र्यानी चार्ज घेतला नाही. पण मी ही पालकमंत्री बद्दल चर्चा कुठे ऐकली नाही
लाडकी बहीण पात्रता निकषात बदल करण्याबाबत त्या म्हणाल्या , मी अगोदर बोलले होते. काल ही बोलले आहे. हे अपेक्षित होते. मला आरोप करायचे नाहीत, फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहेत. महत्वाच्या पदावर बसले आहेत, टीका करण्यासाठी बसले नाहीत. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल पहा. कधी तरी पॉलिसी वर बोलल पाहिजे. राज्य केंद्र याच नात पाहिलं पाहिजे. मी डेटा देईल. डीपीडीसीचे पैसे वळवले जात आहेत. महिलांची फसवणूक होत आहे. तुमच्या प्रश्नांत उत्तर आहे
अजित पवार याचं गेल्या १५ दिवसात कुठलच स्टेटमेंट आलं नाही, पण मुख्यमंत्री रोज दिसत आहे यावरून कोण काम करत आहे दिसत आहे. एकनाथ शिंदे काल दिसले. बजेट येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणविस आम्हाला सगळ्यांना बजेटच्या अगोदर बोलवतील
Supriya Sule admitted that the party had relations with Valmik Karad
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली