विशेष प्रतिनिधी
मुंबई : नागपूर शहर हे एकोप्याने रहाणार शहर आहे. त्यामुळे कोणीही शांतता भंग करु नये. मी स्वत: परिस्थितीवर पूर्ण नजर ठेऊन आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलय, जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल ते अत्यंत गांर्भाीयने घेतलं जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. (Take strict action against rioters, orders the Chief Minister)
नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. वाहनांना आगी लावल्या. अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेक करणाऱ्यांना रोखताना पोलीसही जखमी झाले. दगडफेकीच्या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले. जमावाने तिथे असलेला जेसीबी पेटवून दिला. सोमवारी सायंकाळच्या सुमारास नागपुरात दोन गटांत तुफान दगडफेक झाली. समाजकंटकांनी तोडफोड करत जाळपोळही केली आहे. जमावाला पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर समाजकंटकांनी हल्ला केला आहे. पोलीस आयुक्त हे दगडफेकीत जखमी झाले आहेत. तर, पोलीस उपायुक्तांच्या हातावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे रस्त्यावर उतरले होते. जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त जखमी झाले आहेत. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावातील एकाने धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात कदम यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखम झाली. त्यांना प्रथम मेयो रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल ते अत्यंत गांर्भाीयने घेतलं जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
दगडफेकीच्या घटनेनंतर कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारावर आहेत. रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी 80 जणांना ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्रीपासून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्याच बरोबर नागपूरच्या पोलीस आयुक्तांना त्यांनी सूचना केल्या आहेत.
Take strict action against rioters, orders the Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप