विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशाच्या निवडणूक आयोगाने ईव्हीएममध्ये हेरफेर करणे अशक्य असल्याचे सांगितले असतानाही आदित्य ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधातील आपले पालूपद सुरूच ठेवले आहे. आपण एक चॅलेंज स्वीकारा एकीकडे ईव्हीएमने मतदान घ्या आणि दुसरीकडे बॅलेट पेपरने मतदान घ्या, असे म्हटले आहे.
ईव्हीएममध्ये कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग असण्याचा, मतमोजणीमध्ये काही छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देशातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने हेच सांगितले आहे की, ईव्हीएम टेम्परिंगचे आरोप निराधार आहेत, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले होते. यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ईव्हीएम मशीन काचेच्या बॉक्स मध्ये नको आम्हाला सगळ्यांना उघडून दाखवा.
आमच्या मनात जी तांत्रिकदृष्ट्या शंका आहे ती आम्हाला उघडून दाखवा. ईव्हीएम मशीन जिथे बनवतात त्या कंपन्यांवर डायरेक्टर कोण आहेत त्याचा सुद्धा सोक्षमोक्ष लागू द्या.जर बातम्या निराधार होत्या तर त्यांनी समोरासमोर येऊन आमच्या सोबत चर्चा करायला हवी आधीच्या शिक्षण मंत्र्यांच्या ग्रँड प्लॅनिंगमुळे अजूनही अनेक विद्यार्थ्यांना युनिफॉर्म मिळालेले नाहीत, असा आरोप ठाकरे यांनी केला.
मनसे-शिंदे-भाजप युतीवर ते म्हणाले, मी (मनसे ) त्यांच्याकडे बघत नाही. मी आमच्या कामाकडे बघत असतो . गेल्या अडीच वर्षात किंवा आता पण आम्ही कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही आणि पुढेही करणार नाही.स्वार्थी लोकं जे सगळं काही मिळून सोडून जात असतील. ज्यांना महाराष्ट्राची मराठी माणसांची पडली नसेल त्या लोकांना आम्हाला सोबत ठेवण्यात इंटरेस्ट नाही
लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी योजनेवर ते म्हणाले, आम्ही जे करणार असतो तेच आश्वासन देतो. आम्हाला खोटी आश्वासन जनतेला द्यायची नाही. निवडणुकीच्या वेळी जे आपण बोलतो ते प्लॅनिंगने करायला हवं.
लाडकी बहिण योजना असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल हे त्यांनी फक्त निवडणुकीसाठी केले. आता हे जे सगळं खोटं आहे हे सगळं आता लोकांसमोर येत आहे
ठाकरे कुटुंब सुरक्षा वाढीवर ते म्हणाले, आम्ही वैयक्तिक गोष्टींवर जाणार नाही,. बीडच्या प्रकरणावर सरकारने बोलावे. जे महत्वाचे राज्यातील विषय आहेत त्याला विचलित करण्यासाठी वैयक्तिक गोष्टींवर त्यांनी जाऊ नये.
धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, सुरेश धस, नमिता मुंदडा यांनी जे भाषण केलं त्यांना सरकारमध्ये स्थान नाही का? त्यांच्या मनातलं दुःख त्यांनी मांडलं आहे. भाजपचे कार्यकर्ते, संघाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष करू नये. सरकार जर राजीनामा घेत नसेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी यातून काय समजायचे ?
मराठीच्या मुद्द्यावर सरकारला सवाल करताना ते म्हणाले, ईव्हीएम सरकार या सगळ्यावर काम कधी करणार आम्ही आंदोलन करत राहू. आवाज उठवत राहू. पण सरकार नेमकं काय करतेय? हे आता आलेले सरकार आपल्या राज्यातील लोकांसाठी बोलणार आहे का? फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री असताना अनेक अशी कामं असतात जी चर्चा करुन सोडवू शकतात. ज्यांना वाटतं आम्ही फडणवीसांना भेटू नये त्यांना अजून राजकारण गढूळ करायचा आहे का?. राज्यासाठी चांगलं होत असेल तर ओपनली आम्ही भेटत राहू, सपोर्ट करत राहू, त्याला पाठिंबा देऊ त्याला विरोध करायचा त्याला विरोध करू. गेल्या अडीच वर्षात राज्यात मुख्यमंत्री नव्हते घटनाबाह्य व्यक्ती बसले होते
Take voting on EVMs on one side and ballot papers on the other, Aditya Thackeray’s challenge
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली