विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाणे येथील खाडी किनारा मार्गाच्या कामाच्या ढोबळ अंदाजपत्रकाच्या तुलनेत कामाच्या संख्येत वाढ झाल्याने सविस्तर अंदाजपत्रकात वाढ झाली असून या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाही, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.
प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत अभिजित वंजारी, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, निरंजन डावखरे, सचिन अहिर आदींनी सहभाग घेतला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रश्नाच्या उत्तरात प्रकल्पाबाबतची माहिती दिली.
शंभूराज देसाई म्हणाले की, ठाणे येथील बाळकुम ते गायमुख या 13.45 किमी लांबीच्या खाडी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कोस्ट गार्ड, नौदल, केंद्रीय पर्यावरण विभाग आदींच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन प्रारंभी प्राधिकरणाच्या 16 नोव्हेंबर 2021 च्या बैठकीत 1316.18 कोटींचे ढोबळ अंदाजपत्रक सादर करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती देसाई यांनी दिली.
देसाई म्हणाले की, ठाणे परिसरातील आठ ठिकाणी भुयारी मार्गांचे काम, कास्टिंग गार्ड, पादचारी पूल, तात्पुरता पूल, वाढलेले जीएसटीचे दर आदींमुळे 2024 मध्ये सविस्तर अंदाजपत्रक तयार करताना प्रकल्प खर्चात 3364.62 कोटी रुपये अशी वाढ झाली. याप्रकरणी कोणतीही अनियमितता झालेली नसल्याने एसआयटी स्थापन करण्याची आवश्यकता नाही. तथापि सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन चालू अधिवेशन संपण्यापूर्वी सभापतींच्या दालनात संबंधित सदस्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
There are no irregularities in the work of Thane Bay Coastal Road, Shambhuraj Desai clarified
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप