विशेष प्रतिनिधी
Mumbai News: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे एका महिलेला (Tanisha Bhise) जीव गमवावा लागला आहे. तिच्या पोटी जन्माला आलेल्या दोन्ही मुलींचा उपचार खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तसे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणारच असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भिसे कुटुंबियांचे सांत्वन केले आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचा विश्वास दिला. भविष्यात अशी प्रकरणे होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने एसओपी तयार करणार, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या भेटीदरम्यान भाजप आमदार अमित गोरखे उपस्थित होते. या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरुनही याबाबत माहिती देत, या घटनेतील चिमुकल्या मुलींच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करणार असल्याचं जाहीर केलं.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात शुक्रवारी झालेल्या प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. जन्माला आलेल्या दोन्ही मुली या एनआयसीयूत भरती आहेत. त्यांचा उपचाराचा खर्च जास्त असून तो कुटुंबाला न परवडणारा आहे. त्यामुळे तो खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले. आठव्याच महिन्यात बाळंतपण झाल्याने त्या दोन्ही मुलींना काही दिवस एनआयसीयूत ठेवावे लागणार आहे.
Treatment expenses of Tanisha Bhise’s two daughters from Chief Minister’s Relief Fund
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख