विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray मी जेव्हा शालेय जीवनात पाचवी-सहावीत असताना आम्ही जेव्हा मित्र-मित्र भांडायचो, आम्ही एकमेकांना, सांगायचो की, “तू याच्याशी बोलायचे नाही, त्याच्याशी बोलायचे नाही.” असे काही राजकारणात होईल, असे मला वाटत नाही, असे उदाहरण देत उध्दव ठाकरे शाळेतल्या पाेरासारखे वागत असल्याचे सांगत राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे; ते अशा अटीसमोर झुकतील असे मला वाटत नाही, असे उद्याेग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.Uddhav Thackeray
राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात का? यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर बाेलताना सामंत म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे, राज ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ती मुलाखत आहे, ती दीड महिनापूर्वीची आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यायचा, हा लोकशाहीतील मुद्दा आहे. मात्र, माझे वैयक्तिक मत असे आहे की, राज ठाकरे यांचा एक वेगळा विचार आहे, त्यांचे एक वेगळे अस्तित्व आहे. ते एखाद्या विषयावर ठाम राहतात, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. यामुळे, त्यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही.
सामंत म्हणाले, पहिल्या दिवशीच्या अटी काय होत्या? देवेंद्रजींसोबत बोलायचे नाही, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलायचे नाही, कुणाबरोबर जेवायला जायचे नाही, अमित शहा साहेबांकडे बघायचे नाही, मोदी साहेबांचा फोटो लावायचा नाही. म्हणजे, हे अगदी मी जेव्हा शालेय जीवनात पाचवी-सहावीत असताना, आम्ही जेव्हा मित्र-मित्र भांडायचो, तेव्हा आम्ही एकमेकांना, सांगायचो की, “तू याच्याशी बोलायचे नाही, त्याच्याशी बोलायचे नाही.” असे काही राजकारणात होईल, असे मला वाटत नाही. कारण राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे; ते अशा अटीसमोर झुकू शकते असे मला वाटत नाही.
“कालची जी काही मुलाखत आहे, त्यावरून जे राजकीय रणकंदन निर्माण झाले आहे, त्यात मी शिवसेनेची भूमिका सांगितलेली नाही. मी माझी वैयक्तिक भूमिका सांगितली. जे मी राज साहेबांना ओळखतो किंवा त्यांच्याबद्दल वाचलंय अथवा त्यांच्या बद्दल ऐकलंय. कुठल्याही अटी-शर्तीला अधीन राहून राज साहेब स्वतःला झुकवतील, असे मला वाटत नाही, असेही उदय सामंत म्हणाले.
Uddhav Thackeray’s behavior is like a school bully, Uday Samant said Raj Thackeray will not bow down
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत