विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘टाळी’ची चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या यूट्युब मुलाखतीत उद्धव ठाकरेंकडे मैत्रीचा हात पुढे करत ‘टाळी’चा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही थेट जाहीर कार्यक्रमात “भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती आता मिटवली… चला!” असे म्हणत संभाव्य युतीचा संकेत दिला.Uddhav Thackeray
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेला जाणारा प्रश्न म्हणजे उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीतत राज ठाकरे म्हणाले, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही.
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे. मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो.” मात्र त्याचबरोबर त्यांनी एक ठाम अटही मांडली. “महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो येईल, त्याचं मी स्वागत करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “लोकसभेच्या वेळी आम्ही उद्योग गुजरातला जात असल्याचा मुद्दा मांडला होता, त्यावेळी पाठिंबा दिला असता तर आज महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात-राज्यात असतं. आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची – हे चालणार नाही.”
Uddhav Thackeray’s hint, the fight was not from me, now it’s settled… Come on!” — Open the door to an alliance with MNS?
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना