विशेष प्रतिनिधी
Mumbai News: मंत्री आशिष शेलार यांच्यावर महाराष्ट्र निर्माण सेनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आशिष झोलर, लागली बत्ती पार्श्वभागाला की, येतो शिवतिर्थीवर चहा प्यायला अशी टीका केल्याने भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना सुनावले आहे. आ बैल मुझे मार, असे संदीप देशपांडेने करू नये, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.
गुढी पाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दादरच्या शिवाजी पार्क येथे रविवारी (सभा पार पडली. यावेळी मनसेचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाषण करताना भाजपा नेते आशिष शेलार यांच्यावर कवितेतून निशाणा साधला. मुंबईचा मामा शेलार, पण सगळ्या मुंबईला माहिती आहे, हाच आहे मुंबईचा आशिष झोलार असे म्हणत त्यांनी आशिष शेलार यांच्यावर एकेरी भाषेत निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, “लागली बत्ती पार्श्वभागाला की, येतो शिवतिर्थीवर चहा प्यायला.
वांद्रेतून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला. मुखवटा घालून फिरतो, मीच तुमचा मित्र खरा. पण कपटी मित्रापेत्रा दिलदार शत्रूच बरा. स्वत:ला समजतो, मुंबईचा मामा शेलार. पण सगळ्या मुंबईला माहितीय, हाच आहे मुंबईचा आशिष झोलार.”
संदीप देशपांडे यांच्या टीकेला प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, मला वाटतं तो झोलार बोलण्याचे काम करत आहे. पण हे लोक सोलारवर चालणारे आहेत. त्यामुळे त्यांनी विकासात्मक गोष्टींवर बोलावे. काही सूचना करा, आम्ही अवश्य ऐकू. पण त्यांनी व्यक्तिशः त्यात जायला नको. झोलर कोण आणि खरे कोण? हे पाहण्यापेक्षा आ बैल मुझे मार, असे संदीप देशपांडेने करू नये.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला