विशेष प्रतिनिधी
Mumbai News: जाचक अटींमुळे वॉटर टँकर चालकांनी व्यवसायावर गदा आल्याने 9 एप्रिल मध्यरात्रीपासून पुकारलेला संप मुंबई आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
विहिरी आणि बोअरवेल यामधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने मुंबई महापालिकेने विहिरी आणि बोअरवेल मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक करीत आणखीन काही जाचक नियम लादण्यात आले आहेत.
मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून विहिरी आणि बोअरवेल यांतील पाणी वॉटर टँकरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपसण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा भूजल पातळीवर विपरीत परिणाम होऊ लागल्याने त्याची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेने सदर विहिरी आणि बोअरवेल मालकांना नोटिसा बजावल्या. या नोटिसा बजावताना विहिरी व बोअरवेल मालकांना अटींची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले. तसेच, विहिरी आणि बोअरवेल मालकांनी भूजल बाबत कायदेशीर परवानगी न मिळविल्यास आणि नियम न पाळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागेल, अशी तंबी सुद्धा दिली होती. त्यामुळे विहिरी आणि बोअरवेल मालक आणि टँकर मालक – चालक यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती.
विहिरीतून पाणी उपसा करताना बाजूच्या परिसराची 200 स्क्वेअर मीटर जागा मोकळी ठेवावी, पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक, पाणी मीटर लावावा व त्याचे रिडिंग नियंत्रण कक्ष येथे दिवा दिसायला हवे आदी नियम पालिकेने दाखवून दिले. नियमांचे पालन न करता जर विहिरी आणि बोअरवेल यामधील पाणी उपसा केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. मात्र सदर नियम जाचक असून त्यानुसार व्यवसाय करणे कठीण आहे, असे सांगत 2 हजार टँकर मालकांनी वॉटर टँकर व्यवसाय 9 एप्रिल मध्यरात्रीपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबईत हॉटेल्स व्यावसायिक, इमारत बांधकामे आणि इतर व्यावसायिक यांची पाण्यावाचून अडचण झाली होती. यानंतर आज मुंबई आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद पालिकेने नोटीस मागे घेत असल्याची घोषणा केली. याचवेळी टँकर मालकांनीही आपला संप मागे घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या चार दिवसांनंतर मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
Water tanker strike in Mumbai called off
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका