विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitesh Rane पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांसह 26 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम येथील हल्ल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी राऊतांवर जाेरदार हल्लाबाेल केला आहे. शेंबड्या लाेकांना तुम्ही देशाचे प्रश्न काय विचारता असा सवाल त्यांनी केला.Nitesh Rane
संजय राऊत यांनी अमित शहांचा राजीनामा मागितला आहे, यासंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, शेंबड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न काय विचारता? भांडुपच्या देवानंदला देशपातळीचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचारल्यावर अशीच उत्तर तुम्हाला मिळणार. त्याचा मालक उद्धव ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, त्यावेळी महाराष्ट्र कोरोना काळात नंबर एकला होता. त्यावेळी, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता का? संजय राऊत आता कुठल्या तोंडाने अमित शहा यांचा राजीनामा मागत आहेत?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवले. त्यानंतर सरकारचे नियंत्रण राहावे म्हणून जम्मू-कश्मीर केंद्रशासित केले. त्यामुळे आता पहलगाममधील हल्ल्याची सर्वस्वी जबाबदारी मोदी सरकारची आहे. नेहमी द्वेषाच्या राजकारणात गुंतलेले आणि सरकारे पाडण्यासाठी कटकारस्थाने करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले आहे. ते देशाची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा, एक मिनिटही ते गृहमंत्री पदावर राहण्यास योग्य नाहीत.
What questions do you ask the people like Sanjay Raut about the country? Nitesh Rane’s attack on Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला