Narayan Rane : त्यादिवशी कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवायचे, नारायण राणे का म्हणाले?

Narayan Rane : त्यादिवशी कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवायचे, नारायण राणे का म्हणाले?

Narayan Rane

विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे ज्यादिवशी कोकणात येतील, त्यादिवशी कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवायचे, असे आदेश मी हॉटेल चालकांना दिले आहेत. दुसरे काही करत नाहीत, तेवढेच खायला कोकणात येतात,” असे म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ठाकरे आणि राणेंमधील राजकीय वाद उग्र झाला आहे. कारण, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण, उद्धव ठाकरे कोकणात आले की कोंबडी वडे, मासे बंद ठेवायचे, असे आदेश नारायण राणे यांनी हॉटेल चालकांना दिले आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिले? असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना कोकणाला काही दिले नाही. अडीच वर्षात त्यांनी दिलेल्या पैशांची आकडेवारी जरा पाहा… त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याल्या किती पैसे दिले? ठाकरेंना कोकणावर बोलायचा काहीही अधिकार नाही. कोकणात येण्याचाही त्यांना अधिकार नाही.
चिपी विमानतळावरून आता इंडिगो विमान पण येणार आहे. चिपी विमानतळ बंद होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाईल. लोकांनी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढवावेत, यासाठी माझा प्रयत्न आहे,” असे नारायण राणे यांनी म्हटले.

“मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या 60 फूट पुतळ्याचे 1 मे रोजी अनावरण होईल, अशा प्रकारे नियोजन करून काम सुरू झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे 60 टक्के काम झाले आहे,” अशी माहितीही नारायण राणे यांनी दिली.

Why did Narayan Rane say that chicken vada and fish should be closed on that day?

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023