Jayakumar Gore : जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना रंगेहात अटक

Jayakumar Gore : जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना रंगेहात अटक

Jayakumar Gore

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Jayakumar Gore राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी एक कोटींची खंडणी घेताना रंगेहात पकडले. मंत्री गोरे यांनी आपल्याला अश्लील फोटो पाठवल्याचे महिलेने सांगतले होते.Jayakumar Gore

संबंधित महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटींची खंडणी मागितली. त्यातील एक कोटी घेत असताना सातारा पोलिसांनी अटक केल्याची माहिती उघड झाली आहे., या महिलेने जयकुमार गोरेंवर अश्लील फोटो पाठवत विनयभंग केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात अधिवेशना दरम्यान विरोधकांनी गोरेंचा राजीनामा मागितला होता. परंतू जयकुमार गोरे यांनी हे आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

२०१६ मध्ये गोरेंवर संबंधित महिलेने आरोप केले होते. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गोरेंनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला. आरोप करणाऱ्या महिलेला एक निनावी धमकीचे पत्र आल्यावर तिने पुन्हा एकदा गोरेंवर आरोप केले होते. या प्रकरणाचा निकाल २०१९मध्येच लागला असून गोरे यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

याच प्रकरणात ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुषार खरात यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. 6 मार्च रोजी जयकुमार गोरे यांनी विधिमंडळात पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. लय भारी या यूट्यूब चॅनेलवर किमान 87 व्हीडिओ क्लिप माझ्या आणि कुटुंबाच्या बदनामीसाठी टाकणं दीड वर्षं सुरू आहे. लय भारी चॅनेल आणि त्यांचे पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात मी हक्कभंग प्रस्ताव दाखल करत आहे. न्यायालयानं मला निर्दोष मुक्त केलं आहे, असे गोरे म्हणाले होते.

पुणे महापालिका प्रॉपर्टी टॅक्स गोळा करण्यात अपयशी ठरतेय ? | Pune Municipal Corporation Property Tax

Woman who accused Jayakumar Gore arrested red-handed while taking Rs 1 crore ransom

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023