विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Aditya Thackeray शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक खोचक सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळामध्ये काम केलं तर त्यांना त्या विषयाचा अर्थ समजेल. पाच दहा मिनिटे हजेरी लावून काही समजणार नाही, असे ते म्हणाले.Aditya Thackeray
कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार विधिमंडळ कामकाजाची माहिती दिली. ते म्हणाले, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वेळ उपस्थित होते? कुठलाही प्रश्न त्यांनी मांडला नाही. विधीमंडळ अधिवेशन या काळात दररोज आम्ही 9 तास काम करत होतो . विरोधकांना कोणताच मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळं ते मुद्दे काढत आहेत .
नवीन आलेल्यांना मान सन्मान देऊ, पण जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, असे सांगून अजित पवार म्हणाले, आपला पक्ष सर्व जाती धर्माचा आहे. सरकारमध्ये असो वा विरोधी पक्षात, राजकीय नेत्यांनी सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी विधाने करताना काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत देखील अनेक मुस्लिमांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती किंवा पंथाच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला नाही.
लाडकी बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही माझी थोडी तारांबळ होतेय, पण मी मार्ग काढतोय. 2100 रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असेही अजित पवार म्हणाले.
Work in the legislature, you won’t understand by attending for five or ten minutes, Ajit Pawar’s advice to Uddhav and Aditya Thackeray!
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची