विशेष प्रतिनिधी
Mumbai News: तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका. १९९५ मध्ये सत्ता आली होती तेव्हा इस्तेमासाठी जागा दिली होती. आज बरोबर तिच जागा तुम्ही बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या घशात घातली गेली आहे. बाळासाहेबांचे विचार समजून घ्या. तुम्ही बच्चे होता तेव्हा. आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका, असे प्रत्युत्तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहे.
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र ठाकरे गटाने या विधेयकाला विरोध केला. त्यामुळे ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले अशी टीका होत आहे. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, या बिलाचे हिंदुत्वाशी काय घेणं देणं आहे. मुस्लिमांबाबत सर्व करत आहात तर मग हिंदूंनी काय गुन्हा केला? मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारतो तुम्ही अटलबिहारी वाजपेयींच्या विचारांवर चालणार, नवाज शरीफांच्या की जिनांच्या? काल जेवढ्या काही चर्चा झाल्या त्यावरून तुम्ही जिनांच्या मार्गावर चालणार आहात का?
आमची भूमिका स्वच्छ आहे. या बिलाचा हिंदुत्वाशी संबंध नाही. अमित शाह (Amit Shah), किरन रिजिजू यांनी मुसलमानांचं लांगूलचालन केलं आहे. त्यामुळे हिंदूंचे डोळे उघडले आहेत. हे आपला वापर करत असल्याचं दिसून आलं आहे. हिंदू जागा झाला आहे. त्यामुळे उद्या कुठेही निवडणूक झाली तर भाजपला भारी पडणार आहे” अशी टीका उद्धव यांनी केली.
भाजपला धन्यवाद देईन. त्यांनी वक्फ बोर्डाचा विषय घेतला. त्यामुळे भाजपचं खरं रूप समोर आलं आहे. हिंदूंचे डोळे उघडले आहेत. जेडीयू आणि टीडीपीने सांगितलं, आम्ही मुस्लिमांच्या हिताच्या विरोधात कुणालाही जाऊ देणार नाही. त्यावर अमित शाह पासून कुणाचीही बोलयाची हिंमत झाली नाही. आम्ही मुस्लिम विरोधी आहोत हे सांगण्याची हिंमत त्यांची झाली नाही” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्ही हिंदू मुस्लिम करता, मराठी अमराठी करता हे आम्ही सहन करणार नाही. काय खायचं, काय नाही सांगते हे आम्ही सहन करणार नाही. ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही, गद्दारांचं जे म्हणणं होतं आम्ही हिंदुत्व सोडलंय. तर काल मुस्लिमांचं लांगूलचालन सुरू होतं तेव्हा तुम्ही शेपट्या कुठे घातल्या. तेव्हा का बोलले नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
तुम्हाला मुसलमानांचा तिटकारा असेल तर तुमच्या झेंड्यातील हिरवा रंग काढा. तुम्ही लावालावी थांबवा. फटक्याची वात लावायची आणि पळ काढायचा हे सोडा. आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा या ढोंगाला आणि व्यापारी मित्रांना ज्या भूखंड दिल्या आहेत. त्या भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे. काल त्यांनी सूचना त्यांनी घेतल्या नाही. विरोधक हिंदूत्व धार्जिने आणि सत्ताधारी मुस्लिम धार्जिने वाटत होते. अशा पद्धतीने भाजपचे नेते भाषण करत होते. जींनानाही लाज वाटेल अशी भाषणे होते. मुस्लिम समुदायाचा विरोध करावा असं नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीने समर्थन करत होते, तेच तर लांगूललाचन होतं. काल बिहार आणि बंगाल जिंकण्याची भाषा अमित शाह यांनी केली. भाजपची नीति फोडा आणि राज्य करा अशी आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
You were a child at that time, don’t teach us Balasaheb’s thoughts, Uddhav Thackeray’s reply
महत्वाच्या बातम्या
-
Electricity Consumers : नवीन वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती, वीज ग्राहकांना शाॅक
-
Sanjay Raut : संजय राऊतांची राज्यसभेत नाैटंकी, चुटकी वाजवत म्हणाले काेण म्हणताेय बाळासाहेब ठाकरे
-
Chandrakant Patil: मंत्री चंद्रकांतदादा पाटील सूस घनकचरा प्रकल्पावरून संतप्त, आंदोलनाचा इशारा
-
Raj Thackeray : पुण्यातही मनसेचे मराठी वापरासाठी आंदाेलन, आयसीआयसीआय बॅंकेवर धडकले कार्यकर्ते