विशेष प्रतिनिधी
बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. लोकवर्गणी काढून देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जात आहे. माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, माजलगाव मतदारसंघाच्या वतीने देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून 44 लाख 13 हजार 488 रुपये जमा करून दिले आहेत.
अजून तीन ते चार दिवसांमध्ये लोक निधी गोळा करत आहेत. ते झाले की आम्ही आणून देणार आहोत”, अशी माहिती प्रकाश सोळंके यांनी दिली.
हत्येच्या घटनेला आता जवळपास 25 दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरीही या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहे. त्यांचा शोध सुरु आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी बजावण्यात आली आहे. या प्रकरणी सीआयडीचा विविध पथकांच्या माध्यमातून तपास सुरु आहे. ही घटना प्रचंड भयंकर आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे.
Devendra Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यादीत पहिल्या दहा मध्ये ही नाहीत!
याबाबत प्रकाश सोळंके म्हणाले.
आरोपींना अजूनही अटक झालेली नाही हे दुर्दैवी आहे. तसेच पोलीस यंत्रणा आणि तपास करणाऱ्या यंत्रणालाचं हे अपयश आहे असं मी मानतो. उद्या मी मुंबईला जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर देखील हा सगळा वृत्तांत घालणार आहे. दुर्दैवी आहे, बीड जिल्ह्यामधील पोलीस यंत्रणा संबंध उलटून गेलेली आहे.
दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांची जिल्ह्यातून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी करणार आहोत. निश्चितपणाने नवीन एसपी आल्याने एक शिस्तीचं वातावरण तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यांचा तसा प्रयत्न चालू आहे. सर्वांनी त्यांना सहकारी केलं पाहिजे. एका दिवसामध्ये काही बदल होत नसतो. गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली कीड आहे. ही कीड काढायची असेल तर काही कालावधी त्यांना द्यावा लागेल. वेळोवेळी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात राहून या तपासात वेग मिळावा असा आमचा प्रयत्न आहे”, असं प्रकाश सोळंके म्हणाले.
44 lakhs help to Santosh Deshmukh’s family from public help
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट