विशेष प्रतिनिधी
पुणे : Purandar Airport पुरंदर विमानतळासाठी उद्योग विभागाने विमानतळासाठी सात गावांमधील दोन हजार ८३२ हेक्टर जागा ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.Purandar Airport
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाणे, कुंभारवळण, एखतपूर, उदाची वाडी, मुंजवडी, खानवडी या गावातील जमिनी ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. लवकरच या गावांमधील जमिनीची मोजणी करून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. उद्योग विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार हे क्षेत्र निश्चित केले आहे. या गावांतील बागायती, जिरायती क्षेत्रांचे तसेच नैसर्गिक स्रोत, झाडे, विहीर, नाले, रस्ते, गावे, घरे यांची माहिती घेऊन विमानतळासंदर्भात दोन हजार ८३२ हेक्टर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या गावांमधील जमिनींवर एमआयडीसीचे शेरे मारण्यात येणार असून एमआयडीसी आणि महसूल विभागाच्या बैठकीत भूसंपादनाबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. त्यानंतर वृत्तपत्रांत जाहिराती देऊन हरकती आणि सूचना मागविल्या जातील. त्यासाठी एका महिन्याचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर जमिनीची मोजणी होवून भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरूवात होईल.
ऑक्टोबर २०१६ मध्ये पुरंदर विमानतळाची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीपासून या विमानतळाला विरोध झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमानतळाची जागा बदलण्यात आली. मात्र महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले. त्यानंतर पूर्वीच्या जागीच पुढील पाच वर्षांत विमानतळ होईल अशी घोषणा करण्यात आली. मात्र वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात पुरंदर विमानतळासाठी कोणतीही तरतूद नव्हती. सरकारने आता अधिसूचना जारी केल्याने त्याबाबत एक पाऊल पुढे टाकले आहे.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती येणार असून २ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे भू-संपादन प्रक्रियेला गती येणार असल्याचे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समाजमाध्यमांवर म्हटले आहे.
गावाचे नाव क्षेत्र (हेक्टरमध्ये)
वनपुरी – ३३९
कुंभारवळण – ३५१
उदाची वाडी – २६१
एखतपूर – २१७
गुंजवडी – १४३
खानवडी – ४८४
पारगाव – १ हजार ३७
एकूण – २ हजार ८३२
A step forward for Purandar Airport, areas in seven villages declared as industrial
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!