विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : Pandharpur पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या एका खाजगी बसचा अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. 32 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Pandharpur
हे सर्व भाविक पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत या गावातील आहेत. आज सकाळी पंढरपूर पासून अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावा नजीक हा अपघात झाला.
राजनंदनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस कामशेत येथील भाविकांना घेऊन विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असताना पंढरपूरच्या अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावाजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांची मोठे नुकसान झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 32 जण गंभीर जखमी झाले आहेत.
A terrible accident happened to a private bus of devotees near Pandharpur
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट