विशेष प्रतिनिधी
पुणे : अजित पवार हे बीडसह पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे येथे ध्वजारोहण करायचे असल्याने अजित पवार यांच्याऐवजी ध्वजारोहण करण्यासाठी मंत्री दत्तात्रय भरणे हे बीडमध्ये पोहोचले. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुरूवातीला चर्चा होती की, धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊ शकते.
मात्र, ध्वजारोहणसाठी दत्तात्रय भरणे हे पोहोचले. यावेळी अशी एक घटना घडली, ज्यामुळे काही वेळ मोठी खळबळ निर्माण झाली. दत्तात्रय भरणे यांचा ताफा जात असताना एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ध्वजारोहण करून बीडच्या शासकीय विश्रामगृहाकडे मंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा जात असताना एका तरुणाने ताफ्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नितीन मुजमुले असे या तरुणाचे नाव असून बीड नगरपालिका अंतर्गत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करा अशी मागणी केली. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला.
मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पाडून दत्तात्रय भरणे शासकीय विश्रामगृहाकडे निघाले होते. त्यांचा ताफा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पर्यंत पोहोचताच या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी पोलिसांनी त्याला रोखले. मात्र, काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलिस आता या तरुणाचे अधिकची चाैकशी करत असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलीये. या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर आक्रोश मोर्चे काढले जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सातत्याने केली जात आहे.
A young man attempted self-immolation by pouring petrol on his body in front of Minister Dattatraya Bharne
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार