विशेष प्रतिनिधी
शिरूर : युवकाचे दोन्ही हात, पाय अन् मुंडके छाटून धड एका पोत्यात तर पाय, हात, डोके दुसऱ्या पोत्यात भरुन दोन्ही गाठोडे विहिरीत फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार श्रीगोंदा तालुक्याचे सीमेवर असणाऱ्या दाणेवाडी गावामध्ये घडला आहे. माऊली सतीश गव्हाणे असे क्रूर पद्धतीने खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
माऊली गव्हाणे हा बारावीचा विद्यार्थी आहे. त्याचा खून करताना आरोपींनी त्याचे दोन्ही हात पाय अन् मुंडके छाटले. मयताचे शीर, हात, पाय हे झाडे कट करण्याच्या स्वयंचलित कटरने कापले असण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचे धड एका पोत्यात तर पाय, हात आणि डोके एका पोत्यात भरले. हे दोन्ही गाठोडे त्यामध्ये मोठे दगड भरून दाणेवाडी गावातील नदीच्या बाजूला असणाऱ्या विहिरींमध्ये टाकून दिले होते. पोलिसांना हे मृतदेह मिळाल्यानंतर माऊलीच्या नातेवाईकांना बोलवण्या आले.
माऊली याचा ७ मार्चला बारावीचा पेपर होता. तो पेपर देण्यासाठी त्याच्या दाणेवाडी येथील घरुन शिरूर येथे गेला होता. पेपर दिल्यानंतर परत तो घरीच आला नाही. तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर गावाजवळ असणाऱ्या एका विहिरीत त्याचा मृतदेह सापडला होता.
अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी हा गुन्हा बेलवंडी पोलीस स्टेशनकडून काढून अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी दिला आहे.
A young man was brutally murdered incident in Danewadi village near Shirur
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!