विशेष प्रतिनिधी
पुणे : Bopdev Ghat पुण्यातील बोपदेव घाट परिसरातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला वालचंद पोलिसांनी अटक केली आहे. सूरज उर्फ बापू गोसावी असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार होता.Bopdev Ghat
वालचंद नगर पोलिस एका गुन्ह्यास तपास करत असताना सुरज उर्फ बापू दशरथ गोसावी हा आरोपी अकलूज येथे असल्याचे माहिती मिळाली. सूरज गोसावी हा अकलूज बसस्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत होता. याबाबतची माहिती मिळताच त्याठिकाणी कर्मचारी पाठवून त्याला ताब्यात घेतले. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी सूरज गोसावी याला पुणे शाखा युनिट 5 यांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती आहे.
बोपदेव घाट परिसरात 3 ऑक्टोबर रोजी तिन्ही आरोपींनी आपल्या मित्रासोबत फिरण्यास आलेल्या परराज्यातील 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता.
आरोपींनी तत्पूर्वी, रात्री 8.30 च्या सुमारास या आरोपींनी बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या येवलेवाडी येथील एका बिअर शॉपीमधून बिअर विकत घेतली. ती त्यांनी प्राशन केली. त्यानंतर तिघेही रात्री 10.30 च्या सुमारास ते घाटातून सपाटीच्या दिशेने निघाले. त्यांना पीडित तरुणी व तिचा मित्र दिसले. त्यांनी त्या दोघांना धमकावले. त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू घेतल्या. तसेच पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.
तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिन्ही आरोपी पुन्हा घाटाच्या वरच्या बाजूला गेले. त्यानंतर दुसऱ्या मार्गाने ते घाट उतरले. तसेच वेगवेगळ्या मार्गांनी खेड शिवापूरला गेले. टोलनाक्यावरून त्यांनी आणखी वेगळा मार्ग निवडला. 4 ऑक्टोबर पहाटेपर्यंत ते फिरत राहिले. या कालावधीत त्यांनी कुठेही मोबाईलचा वापर केला नाही. दिवस उजाडल्यानंतर तिघेही वेगवेगळे झाले. बोपदेव घाटात तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी 20 किमीचे अंतर कापण्यासाठी तब्बल 81 किलोमीटरचा प्रवास केला. या प्रकरणातील पहिल्या आरोपीला 11 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय 20, डिंडोरी, मध्य प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे.
Accused in Bopdev Ghat gang rape case arrested
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला