Icer : आयसरमध्ये माओवादी वक्त्यांवर बंदी आणावी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी

Icer : आयसरमध्ये माओवादी वक्त्यांवर बंदी आणावी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी

Icer

विशेष प्रतिनिधी

पुणे: Icer पुण्यातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ‘इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ (आयसर) येथे आयोजित ‘मुक्तीपर्व’ या कार्यकर्मात माओवादी वक्त्यांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली आहे. याबाबत पोलीस उपयुक्त हिम्मत जाधव आणि आयसरचे संचालक डॉ. सुनील भागवत यांना तसे लेखी पत्र देण्यात आले.Icer

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयसर संस्थेत ‘मुक्तीपर्व’ या कार्यक्रमाचे २ ते १४ एप्रिलदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कट्टरपंथी माओवादी चळवळीत सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे फुटीरतावादी, धार्मिक आणि जातीयवादी टीकाटिप्पणी होवू शकते. तसेच अनेक आक्षेपार्ह लेखकांच्या पुस्तकांचे या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रदर्शन लावण्यात येणार आहे. त्यामुळे कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, असा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे.

मुक्तीपर्व हा कार्यक्रम प्रा. सुहिता नाडकर्णी आणि प्रा. मयुरिका लाहिरी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी झालेल्या ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रमात अनेक धार्मिक आणि जातीयवादी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेक विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी व्हावी. मात्र अशा कट्टरपंथी माओवादी लोकांना आमंत्रित केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

अभविपकडून आयसरचे संचालक डॉ. सुनील भागवत यांना निवेदनाद्वारे परिसरात कार्यक्रमांना कोण वक्ते म्हणून येत आहेत? याची चौकशी करूनच अशा कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा अभविपकडून देण्यात आला आहे.

अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी म्हणाले, आयसरमध्ये मुक्तीपर्व या कार्यक्रमात देशविरोधी चळवळीत सहभाग असल्याचे आरोप असलेल्यांना वक्ते आणि अतिथी म्हणून आमंत्रित करणे दुर्दैवी आहे. कट्टरपंथी माओवादी आणि जातीयवादी लोकांना बोलवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मलीन करण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या वक्त्यांवर निर्बंध घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी.

All India Students’ Council demands ban on Maoist speakers in Icer

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023