राम गणेश गडकरींच्या राजसंन्यास नाटकावर बंदीची अमोल मिटकरींची मागणी, सीकेपी समाज आक्रमक

राम गणेश गडकरींच्या राजसंन्यास नाटकावर बंदीची अमोल मिटकरींची मागणी, सीकेपी समाज आक्रमक

Amol Mitkari

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राम गणेश गडकरी गडकरी यांच्या ‘संपूर्ण गडकरी’ या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. गडकरी विकृत आणि दारू पिऊन लिहिणारे होते, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सीकेपी समाज आक्रमक झाला आहे. Amol Mitkari

पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीचे लिहीले गेले आहे. राज्य सरकारच्या साहित्य आणि सांस्कृतीक मंडळाने हे पुस्तक प्रकाशीत केल्याचं ते म्हणाले. शिवाय त्यांनी गडकरींच्या लिखाणावरही मिटकरी यांनी आक्षेप नोंदवला आहे. संपूर्ण गडकरी या पुस्तकात सात नाटकाचा समावेश आहे. त्यात राज सन्यास हे एक नाटक आहे. ते छत्रपती संभाजी महाराजांवर आहे. मात्र त्यात महाराजांची बदनामी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदल खूप चुकीचा इतिहास लिहिण्यात आला आहे. राम गणेश गडकरी हे कधीच चांगलं लिहत नव्हते असंही ते यावेळी म्हणाले. Amol Mitkari

राम गणेश गडकरी हे कायम दारू पिऊन लिखाण करायचे. ते एक विकृत लेखक होते. या पुस्तकावर तात्काळ बंदी घातली पाहीजे अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगिले. ही बाब सरकाच्या लक्षात आणून देणं हे माझं काम आहे. ऐकलं तर ठीक नाही तर मी प्रयत्न केला यात समाधानी आहे, असं मिटकरी म्हणाले.

सदर पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलं आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा मलिन होईल अशा प्रकारची भाषा वापरण्यात आली आहे, असा मिटकरींचा दावा आहे. अशा आक्षेपार्ह पुस्तकावर बंदी आण्यासाठी समितीची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत केलेल्या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की,गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांनी छ. संभाजी महाराजांची बदनामी करणार विकृत लेखन ज्या “राजसंन्यास” पुस्तकातुन केलं ते पुस्तक आणि त्या पुस्तकासह हीन पातळीवर बदनामी करणाऱ्या इतरही पुस्तकांवर आता कायमची बंदी घालावी.

भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात मंगळवारी तीव्र निदर्शने करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला. यावेळी सीकेपी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळे फासले आणि मिटकरींवर कारवाईची मागणी केली. निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले.

भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी सहन करणार नाही असा इशारा आंदोलकांतर्फे अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्तीचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी याप्रसंगी दिला.

अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई झाली नाही तर यापुढे महाराष्ट्राच्या जिल्हा जिल्ह्यात व तालुकास्तरावर निदर्शने व निवेदने देण्यात येणार असल्याचे याप्रसंगी समीर गुप्ते यांनी जाहीर केले.

Amol Mitkari demands ban on Ram Ganesh Gadkari’s Rajsanyas play, CKP community aggressive

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023