विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम सुरू करण्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. संसदेत मराठी बोलायची लाज वाटते का असा सवाल सुळे यांना केला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम (पॅटर्न) लागू होणार आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात घोषणा केली होती. या घोषणेनंतर आता नवा वाद सुरू झाला आहे. याच घोषणेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. तर ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाची अंमलबजावणी म्हणजे राज्य शिक्षण मंडळ संपूर्णतः बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता.
सुळेंच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पलटवार केला आहे. याबाबत चाकणकर यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, सुप्रिया सुळेंना या निर्णयामुळे महाराष्ट्राची ओळख पुसणार अशी शंका वाटते.मग संसदेत काम करत असताना तुम्ही मराठीतच का बोलत नाहीत ? तिथे मराठी बोलताना लाज वाटते का ? तसेच अभिजात भाषा मराठी,संस्कृती,परंपरा याचा विचार सुप्रिया सुळे करतात कारण त्या स्वतः व त्यांची मुले हे परदेशात शिकून आलेत !
महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागत केलेच पाहिजे, असेही त्या म्हाला.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत सरकारी शाळेतील विद्यार्थी कुठेतरी कमी पडतो.मग हा अभ्यासक्रम सरकारी शाळेत लागु झाल्यावर तेथील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात क्रांती घडलेच यात शंका नाही.आणि केवळ अभ्यासक्रम लक्षात ठेवण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या तर्कशक्ती आणि विश्लेषणात्मक क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भर देणे गरजेचे आहे,हेच महत्वपूर्ण काम राज्य सरकारने केले आहे.
काही राजकीय मंडळींना आपल्या शिक्षण संस्थांवर टाच येणार याची जाणीव झाल्यामुळेच त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम अचानक उफाळून आले.उगाच सरकारवर टीका करून सरकारचा नवीन डाव वगैरे असे शब्दप्रयोग करून सामान्य कुटुंबातील मुलं मुख्य प्रवाहापासून लांब कसे राहावेत तसेच त्यांची दिशाभूल होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत., असा आरोप चाकणकर यांनी केला आहे.
ऐतिहासिक निर्णय..
महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागत केलेच पाहिजे.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत सरकारी…— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 22, 2025
Are you ashamed to speak Marathi? Rupali Chakankar’s question to Supriya Sule
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार