विशेष प्रतिनिधी
Nashik News: महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले हाेते. मात्र, नुकतेच अजित पवारांनी कर्जमाफी हाेणार नसल्याचे सांगितले सांगितले. कर्जमाफीवरून एका शेतकऱ्याने कृषी मंत्री माणिकराव काेकाटे (Manikrao Kokate) यांना विचारले असता ते त्याच्यावरच भडकले.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी काेकाटे नाशिक जिल्ह्याच्या दाैऱ्यावर हाेते. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीबाबत विचारले की, अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, रेग्यूलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?’
शेतकऱ्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, “जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची., तोपर्यंत काही भरायचं नाही. समोर मीडिया उभी आहे. त्यामुळे मीडियासमोर मी जास्त बोलत नाही. पण मला एक सांगा, कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का?”
काेकाटे म्हणाले, आता सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईप लाईनला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा.
काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफी हा माझा विषय नाही. याबात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतली, असं त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसून शेतकऱ्यांनी कर्ज भरावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं.
Asked about the loan waiver and the Manikrao Kokate sometimes got angry with the farmer
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा