संतोष देशमुख हत्येमागील मास्टरमाईंडवर कारवाई व्हावी, बाळासाहेब थोरात यांची मागणी

संतोष देशमुख हत्येमागील मास्टरमाईंडवर कारवाई व्हावी, बाळासाहेब थोरात यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

बीड : गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे;परंतु संतोष देशमुख हत्येमागील मास्टरमाईंड कोण याची चौकशी झाली पाहिजे. त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर सांगितले.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथे हत्या झालेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्यावरुन कायद्याचं राज्य राहिले की नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढ्या महत्त्वाच्या व्यक्तीची अशा पद्धतीने हत्या होते तर सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे काय? ही घटना काळजी लावणारी आहे.

महाराष्ट्र, देशाची आता वाईट परिस्थिती आहे. राहुल गांधी यांना मी कळवले होते. आम्हा सर्वांना संवेदना आहेत. आम्ही जात धर्म बाजूला ठेवला आहे असे सांगून थोरात म्हणाले, कायद्याचे राज्य धाकावर चालते. गुंडावर धाक असला पाहिजे. वेळीच रोखलं नाही तर काय घडतं याचे हे उदाहरण आहे. शासन म्हणून धाक असला पाहिजे.या प्रकरणात कुणालाही सवलत मिळाली नाही पाहिजे. बीड मध्ये अतिरेक आहे हे दिसून येत आहे. राजकारणाची पातळी खालवलेली दिसते.

जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत समाधान होणार नाही. गुंडगीरीचा बीमोड होत नाही तोपर्यंत अस्वस्थता आहे. यात पक्ष नाही महाराष्ट्राने सर्वात वाईट निवडणूक पाहिली हे दुर्दैव आहे, असेही थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat demands that action be taken against the mastermind

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023