विशेष प्रतिनिधी
मुंबई : बुद्धांनी जातिप्रथेला विरोध केला. पण, बुद्धांनी जातीनिर्मूलनासाठी काम केलेच नाही असे वक्तव्य केल्यावर तथागतांचा अपमान करता, आमच्या भावना दुखावता, अशी तक्रार करणाऱ्या महिला पत्रकाराला विचारवंत आनंद तेलतुंबडे यांनी गाे टू हेल म्हटल्याचा प्रकार घडला आहे. Anand Teltumbde
“मूलभूत अधिकार संघर्ष समिती’तर्फे ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ पत्रकार भवन येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या विषयावर आनंद तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बाेलताना तेलतुंबडे म्हणाले, बुद्धांनी जातिप्रथेला विरोध केला. पण, बुद्धांनी जातीनिर्मूलनासाठी काम केलेच नाही. Anand Teltumbde
आनंद तेलतुंबडे यांच्या व्याख्यानानंतर प्रश्न विचारू दिला नाही. मात्र, कार्यक्रमानंतर पत्रकार योगिता साळवी यांनी तेलतुंबडे यांना व्याख्यानातील विधानाबाबत प्रश्न विचाारले. पण, आयोजक प्रश्न विचारू देत नव्हते. यावर तेलतुंबडे यांना गाठत प्रश्न विचारला की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉ. बाबासाहेबांचा छळ करत होता, शिवीगाळ करत होता असे तुम्ही म्हणालात; पण आमचे डॉ. बाबासाहेब शेर होते, निडर होते. त्यांना डिवचणार्यांना ते कधीच सोडत नसत, मग संघाने इतका त्रास दिल्यावर, शिवीगाळ केल्यावर ते का बोलले नाहीत? काही बोलले असतील तर कुठे लिहिलेले आहे का?” असा प्रश्न केला. यावर तेलतुंबडे यांनी, “डॉ. बाबासाहेब गेल्यावर त्यांनी शिवीगाळ केली,” असे उत्तर दिले. Anand Teltumbde
पुढे योगिता साळवी यांनी तेलतुंबडेंना विचारले की, “तुम्ही म्हणालात बुद्धांनी जातीनिर्मूलनासाठी काम केलेच नाही? असे कसे म्हणू शकता? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धांचा धम्म स्वीकारला. यावर तेलतुबंडे यांनी उत्तर दिले की, “तुमच्या भावना दुखावतात ‘गो टू हेल’.” दरम्यान, यावर “मुली-महिलांशी असे वागणारे हे असे विचारवंत ‘यु गो टू हेल” असे योगिता साळवी यांनी सांगितले. मात्र, यावेळी उपस्थित असलेले लोक योगिता यांना बोलताना थांबवत होते, प्रश्न विचारू देत नव्हते, असे दिसून आले आहे.
Buddha did not work for caste abolition, Anand Teltumbde’s claim
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची