विशेष प्रतिनिधी
मुंबई; सतत माझ्या कॅरेक्टरवर वेडेवाकडे बोलण्याचा प्रयत्न असतो. ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात, असा पलटवार आमदार चित्रा वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केला आहे.
गुरुवारी चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात सभागृहात खडाजंगी झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56 जण पायाला बांधून फिरते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
यावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात. त्यांनी काल ज्या पद्धतीने माझ्याबद्दल द्विट केले ते त्या नेहमीच करतात. सतत माझ्या कॅरेक्टरवर वेडेवाकडे बोलण्याचा प्रयत्न असतो. पण मला प्रश्न पडला की, हे अजून किती वर्षे हे प्रश्न विचारणार? माझ्या कॅरेक्टरला धरुन जे बोलले जाते, जे विचारले जाते, तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय? विषय सुषमा अंधारेंचा नव्हताच. त्यांचे नेते अनिल परब यांनी माझ्याकडे बोट दाखवून मला प्रश्न विचारला. मग मी त्यांना उत्तर देऊ नको का?”
सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ शिवसेनेत येण्यासाठी लोळत उध्दव ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या. त्याला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता. चित्राताई एकदा येऊ भेटा.
तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे, असा तो निरोप होता. मी जाणे न जाणे हा नंतरचा भाग होता. पण त्यांच्या शब्दाला मान म्हणून मी नक्की गेले होते. पण मी स्वतःहून गेले नव्हते तर त्यांनी मला बोलावले. त्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा होते. त्यामुळे मिलिंदजी मला दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील घेऊन गेले. तेव्हा मी त्यांना म्हटले होते की, मला ठरवू द्या. मी अजून विचार केलेला नाही. त्यावेळी तिथे आदित्य ठाकरे देखील होते. मिलींद नार्वेकर यांच्याकडे स्वतः उद्धव ठाकरे यांनी निरोप पाठवला होता. बाळासाहेब जिथे बसायचे तिथले दर्शन घ्यायची माझी ईच्छा होती आणि यानिमित्ताने ही एकच गोष्ट त्यावेळी चांगली झाली. हा सगळा घटनाक्रम बोलण्याआधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांना विचारा.
Chitra Wagh counterattack on Sushma Andhare
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार