विशेष प्रतिनिधी
पुणे : Devendra Fadnavis धर्म विचारून हिंदूंना गाेळ्या घातल्या गेल्या हे ज्यांना मान्य करायचं त्यांनी मान्य करावं. ज्यांना डोळे उघडे ठेवून झोपेचे सोंग घ्यायचा असेल त्यांनी कोणाचीही वक्तव्य ऐकली नसल्याचे सांगितले आहे, असा हल्लाबाेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला.Devendra Fadnavis
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांची पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वनपर भेट घेतली.
पत्रकारांशी बाेलताना फडणवीस म्हणाले, देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात. पाकिस्तानी लोकांना देश सोडण्याची नोटीस दिली आहे. त्यांना परत जाण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. ४८ तासात ते देश सोडून न गेल्यास कारवाई करण्यात येणार आहे. दहशतवादी विरोधात लढण्याचा आमचा इरादा अजून मजबूत झाला आहे. बेकायदा पाकिस्तानी सापडतील त्यांना 48 तासात पाठवण्याची प्रक्रिया होईल. मात्र जे बेकायदेशीर राहतील ते सुद्धा सापडतील. ज्या पद्धतीने बांगलादेशी सापडले तसेच बेकायदा पाकिस्तानी सुद्धा सापडतील ही पॉलिसी केंद्राने ठरवलेली आहे. काही बाबतीमध्ये आपण उगाच मानवतावाद दाखवतो.
पाकिस्तान मध्ये तीन-चार पाणी योजना सुरू आहेत. एका दिवसात हे सगळं होत नाही. ज्या पाण्यावर पाकिस्तान अवलंबून आहे. ते जर बंद केलं तर पाण्याविना ते तडफडतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा कुटुंबातील व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. या सहा परिवाराला निश्चित मदत केली जाईल आसावरी जगदाळे यांनी केलेलं वर्णनामुळे मन हेलावून जाणारा असून हे सगळं अनाकलनीय आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis attack Sharad Pawar, while sleeping with his eyes open
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला