विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या समितीत उपसचिव यमुना जाधव, मुख्यमंत्री सचिवालयातील धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे सह कक्षप्रमुख किंवा कक्ष अधिकारी, सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक तसेच विधी व न्याय विभागाचे उपसचिव किंवा अवर सचिव हे सदस्य सचिव म्हणून सहभागी असतील.
या प्रकरणानंतर धर्मादाय रुग्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. सर्व धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखीव खाटा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची’ मान्यता घ्यावी. यासंदर्भात सर्व रुग्णालयांना तातडीने निर्देश देण्यात येणार आहेत.
विधी व न्याय विभागाने गठीत केलेल्या तपासणी पथकाने सादर केलेल्या अहवाल व शिफारशींवर त्वरित कार्यवाही केली जाईल. शासनाने धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवकांच्या भरतीला मान्यता दिली असून ही पदे तातडीने भरली जाणार आहेत.
निर्धन रुग्णनिधी (IPF) खात्याची माहिती अद्ययावत करून ती धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुग्णालयांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या महिलेला आपला प्राण गमवावा लागला.
या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
भाजपाचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. पुण्यातील प्रसिद्ध अशा दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाने केलेल्या आडमुठेपणामुळे महिलेला जीव गमवावा लागला. ऑपरेशनसाठी तातडीने १० लाख रुपये द्या, अन्यथा आम्ही उपचार करणार नाही. जर पैसे देण्यास दमत नसेल तर तुम्ही तुमच्या रुग्णाला ससून रुग्णालयात घेऊन जा, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. यानंतर महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिने दोन बाळांना जन्म दिला. पण यानंतर मात्र त्या महिलेचा मृत्यू झाला.
Devendra Fadnavis takes serious note; Committee formed to inquire into Dinanath Mangeshkar Hospital case
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा