विशेष प्रतिनिधी
जालना : संतोष देशमुख यांचा खून हा धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून झाला आहे. त्यामुळे 302 च्या प्रकरणात धनंजय मुंडे आरोपी होतात. पण, सरकारचे काही प्रतिनिधी संतोष देशमुख प्रकरणात घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडेंना वाचवले, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Suresh Dhas saved Dhananjay Munde, alleges Manoj Jarange)
खून खटल्यातील आरोपी मुंडेंच्याच पक्षातील आहेत. ते आरोपी मुंडेंनाच पैसे देत होते, त्यांच्याजवळ रोज असायचे. मुंडेंनी शक्ती दिल्याशिवाय खून करायची धमक कुणामध्ये नाही. तसेच, सरकारचे काही प्रतिनिधी संतोष देशमुखांच्या खून प्रकरणात घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडेंना वाचवले, असा आरोप जरांगे-पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणाकेला.
जरांगे-पाटील म्हणाले, “सत्य कधीच झाकत नाही. तुम्ही किती प्रयत्न केले, तरी नियतीला मान्य नसते. धनंजय मुंडेंची संघटित गुन्हेगारी आहे. खंडण्या वसूल केल्या जायच्या. हा पैसा धनंजय मुंडेंना दिला जायचा. हत्याप्रकरणातील एक नंबरचा आरोपी टोळी तयार करून, अशी कृती करत होता. एक नंबरच्या आरोपीनेच खंडणीसाठी खून करायला लावल्याचे सिद्ध झाले.
माझ्या नादी लागू नका. इथून पुढे माझ्या नादी लागल्यास सोडणार नाही,” असा इशारा देत जरांगे-पाटील म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्या विरोधात मोर्चे काढायला लावले, रस्ता रोको आंदोलन करायला लावले. माझा संबंध नसताना माझ्या फोटोला धनंजय मुंडेंनीच चपला हाणायला लावले. तुम्ही, असे कितीही कृती केली, तर नियतीला मान्य नाही. तुम्हाला याचे फळ मिळाले.
Dhananjay Munde was saved only because government representatives entered, Manoj Jarange alleges against Suresh Dhas
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची