विशेष प्रतिनिधी
पुणे : Jejuri महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर मोठ्याप्रमाणात भाविक येत असतात. या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. त्यासाठीची नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवीन वस्त्रसंहितेनुसार भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल.Jejuri
श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल. वेस्टर्न कपडे परिधान करुन आलेल्या भाविकांना खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही. पुरूष अथवा महिला मंदिरात कमी कपड्यांमध्ये आल्यास प्रवेश मिळणार नाही. त्याचबरोबर फॅग म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड- कमी कपडे घालणाऱ्यांसही प्रवेश बंदी असणार आहे
चंपाषष्ठीला याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाला येतात. कारण चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो. यामुळे भाविक श्रद्धेने देवस्थानामध्ये येऊन खंडेरायाच्या दर्शन घेतात. यातच आता महिला आणि पुरुषांना सारखेच असे काही नियम लावण्यात आले आहेत. ज्याचे पालन करण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट व विश्वस्त मंडळ करत आहेत.
Dress code for devotees at Jejuri , Indian attire required
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श