Ashtavinayak Ganpati : अष्टविनायक गणपतींसह पाच मंदिरात ड्रेसकोड लागू, भाविकांना दर्शनासाठी पोशाख निश्चित

Ashtavinayak Ganpati : अष्टविनायक गणपतींसह पाच मंदिरात ड्रेसकोड लागू, भाविकांना दर्शनासाठी पोशाख निश्चित

Ashtavinayak Ganpati,

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ashtavinayak Ganpati चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून अष्टविनायक गणपतींसह पाच मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने पत्रक जारी करत माहिती दिली आहे. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहितेचा निर्णय घेण्यात आला असल्याचे चिंचवड देवस्थान ट्रस्टने या पत्रकात म्हटले आहे.Ashtavinayak Ganpati

देवस्थान संस्थानकडून मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, चिंचवडचा मोरया गोसावी संजीवनी मंदिर, खार नारंगी मंदिर या 5 मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. हे पाचही देवस्थान चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारित येतात. त्यामुळे चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून वस्त्रसंहितेचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे आणि श्री मंगलमूर्ती वाडा येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून, ते अधा, संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहे.

येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा आणि भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे. त्यासाठी श्रींच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिरात प्रवेशासाठी खालीलप्रमाणे योग्य पोशाख परिधान करावा, असे आवाहनही देवस्थानकडून करण्यात आले आहे. आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून असावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मंदिराच्या पवित्रतेचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देवस्थानकडून भाविकांसाठी दर्शनासाठी येताना पोशाख निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा. महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे. कोणीही अति आधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नयेत, असे चिंचवड देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

Dress code implemented in five temples including Ashtavinayak Ganpati, devotees have to wear certain attire for darshan

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023