विशेष प्रतिनिधी
वर्धा : वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा प्रकार समाेर आला आहे. वर्ध्यातील राममंदिरातील गर्भगृहात सोवळे आणि जानवे घातले नाही म्हणून आपल्याला प्रवेश नाकारल्याचा आरोप रामदास तडस यांनी केला. त्यावरून पुजारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वाददेखील झाला. गेली 40 वर्षे श्री रामाच्या दर्शनासाठी जातो, पण यावेळी विचित्र वागणूक मिळाल्याची खंत तडस यांनी व्यक्त केली.
तडस म्हणाले की, “रविवारी (6 एप्रिल) सकाळी 10 वाजता राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी पत्नीसाेबत गेलो होते. काही कार्यकर्तेही सोबत होते. राम आमच्या हृदयात आहे, माझी आस्था आहे. दरवर्षी मी तिथे जात असतो. पण यावेळी मला वेगळा अनुभव आला. यावर्षी मला मुर्तीची पूजा करण्यास मनाई केली.
सोवळे घातलेले नाही, जानवे घातले नाही म्हणून तुम्ही पूजा करू शकत नाही, तुम्ही दुरून दर्शन घ्या असे त्यांनी मला सांगितले. तो पुजारी मंदिराचा ट्रस्टी असून तो पुण्याला राहतो. फक्त रामनवमीला येतो. त्याला आमच्या कार्यकर्त्यांसह सर्वांनी दरवर्षीचा नित्यक्रम आणि परंपरा सांगितली. मात्र तरीही पुजेसाठी त्याने आम्हाला नकार दिला.
मग मीच सर्वांना समजावून सांगितले की चांगल्या दिवशी वाद नको. ते नाही म्हणतात तर आपणही हट्ट करायला नको. रामाविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात आस्था आहे. बाहेरून दर्शन घेऊन परत फिरू, असे कार्यकर्त्यांना सांगून आम्ही तिथून निघून आलो. परंतु आमच्यासाठी हा प्रकार धक्कादायक होता, असे सांगून तडस म्हणाले, या देवस्थानाची 200 एकर जमीन आहे. पण तरीही सर्व गोष्टी आम्ही आमच्या पैशांमधून मंदिरासाठी करतो, अशी त्यांची तिथे मक्तेदारी चालते.
Ex-MP denied entry to temple sanctorum : ramdas tadas
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख