विशेष प्रतिनिधी
Pune News : विविध दाखल्यांसाठी तलाठी भाऊसाहेबांकडे मारावे लागणारे हेलपाटे वाचले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या एका वर्षात शेतीशी संबंधित तब्बल ४ कोटी ३५ लाख अभिलेख (विविध प्रकारच्या नकला) घरबसल्या डाऊनलोड केल्या आहेत. यातून महसूल खात्याला नक्कल शुल्काच्यापोटी तब्बल ७६ कोटी ८० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
शेतकरी तंत्रस्नेही झाल्यामुळे राज्याच्या महसूल विभागात डिजिटल क्रांती झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यातील ई-महाभूमी प्रकल्पाची आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारे, (७/१२ उतारा), खाते उतारे, ( गाव नमुना नंबर ८ अ), फेरफार नोंदीचे उतारे आणि मिळकत पत्रिका या नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या डाउनलोड करून घेता येतात.
यानुसार शेतकऱ्यांनी सरत्या आर्थिक वर्षात ए ३ कोटी ३ लाख ७७ हजार ८७५ सातबारा उतारे, ९६ लाख ५६ हजार ५२६ खाते उतारे (८ अ), २० लाख ३१ हजार ५२२ फेरफार नोंदीचे उतारे आणि १५ लाख २१ हजार ७९२ मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) शेतकऱ्यांनी डाऊनलोड केले आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीत उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचा सिंहाचा वाटा होता. जगताप हेच या प्रकल्पाचे पहिले समन्वयक होते.
राज्याच्या महसूल विभागातील ई-फेरफार आणि ई -महाभूमी प्रकल्पाचे यश पाहून, या सेवेतून समाधान होत आहे. कारण ही आकडेवारी पाहता महसूल विभागात झालेली ही डिजिटल क्रांती आहे, असे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.
Farmers in Maharashtra became high-tech, the government got Rs 76.80 crore
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला