विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर: छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडिले यांना अश्रु अनावर झाले. वैचारिक मतभेदामुळे मी बाजूला झाला असलो तरी मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, असेही ते म्हणाले.
घोडिले यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, 35 वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्नी व इतर सहकारांसोबत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. पस्तीस वर्षे काम केल्यानंतर पक्षप्रवेश करून सोडचिठ्ठी देताना कुठेतरी वाईट वाटलं. ज्या पक्षात प्रवेश केला त्या पक्षाची विचारधारा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे आहे. शिंदे यांचा पक्ष त्याप्रमाणे काम करतो. त्यामुळे मी त्या पक्षात प्रवेश केला.
घोडिले म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने उबाठा गटाला नाकारले.
विकास करायचा असेल तर सत्ता आणि सत्ताधारी पक्षात असावं लागतं. मी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला त्याबद्दल ठाकरे गटाबद्दल माझी नाराजी नाही. उद्धव ठाकरे यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. एकाच घरात दोन वेळा महापौर होण्याची संधी ठाकरेंनी दिली. शिंदे सेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर मी कुठली बार्गेनिंग केली नाही. मला फक्त पक्षात संधी पाहिजे होती एकनाथ शिंदे यांनी पक्ष वाढवण्याचे काम तुमच्या माध्यमातून करावं असं त्यांनी सांगितलं.
मी कोणत्याच प्रकारच्या हव्यासापोटी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो नाही असे सांगून घोडिले म्हणाले, मला दोन वेळा केलं महापौर त्याचं उपकार मी विसरणार नाही चंद्रकांत खैरे माझे गुरु आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त केली असेल. परंतु त्यांची भावना चांगली असेल. चंद्रकांत खैरे नैराश्य पोटी बोलले असतील. त्याचे मला वाईट वाटत नाही. पक्ष सोडताना कुणाला वाईट बोलणार नाही. हा माझा स्वभाव नाही. पक्षाने मला जे काही दिलं असेल ते माझ्या स्वभावामुळे दिला असेल. प्रत्येक व्यक्ती हा राजकीय इच्छाशक्ती घेऊन असतो. परंतु अगोदर काही करून दाखवावे लागते. नंतर हवं ते मागावे लागेल. रेडीमेड कार्यकर्ता तिकडे जात कामाच्या मूल्यमापनावरून मला पद किंवा महापौर पद मिळेल.
Former mayor of Chhatrapati Sambhajinagar shed tears
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली