विशेष प्रतिनिधी
पुणे : माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबीक वादातून त्यांनी पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मात्र अन्नातून विषबाधा झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
उषा काकडे यांनी झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केले आहे. दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास ही घटना घडली आहे. उषा काकडे यांची प्रकृती गंभीर आहे.
मात्र रुबी हॉल रुग्णालयाने अन्नातून विषबाधा झाल्याचे म्हटले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
उषा काकडे ग्राविटियस फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करतात. ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापकहाणून उषा काकडे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे.महिला आणि बालकांसाठी काम करण्यासाठी ग्रॅव्हिटस फाउंडेशनद्वारे काम करतात.
बाललैंगिक शोषणाविरोधात देखील त्या काम करत होत्या. गुड टच बॅड टच या उपक्रमाच्या प्रणेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. देशभरातील उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांना ऊर्जा पुरस्कार देऊन त्या गौरवितात.नुकतेच त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे.
Former MP Sanjay Kakade’s wife Usha Kakade attempted suicide? Family claims food poisoning
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल