विशेष प्रतिनिधी
मुंबई : जरांगे तुझी उंची किती आहे, तुझं शिक्षण काय? तू बोलतो काय? पावशेर दारू पिऊन जर कुणी मंत्री धनंजय मुंडेंना अपमानित करण्याच धाडस करत असेल तर तो कितीही मोठा असो, त्याची गय केली जाणार नाही, असा जोरदार हल्लाबोल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलाय.
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी शनिवारी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातील सभेतून बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना थेट इशारा दिला होता. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही, देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.
यावरून वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले, जरांगे तुझी उंची किती आहे, तुझं शिक्षण काय? तू बोलतो काय? पावशेर दारू पिऊन जर कुणी मंत्री धनंजय मुंडेंना अपमानित करण्याच धाडस करत असेल तर तो कितीही मोठा असो, त्याची गय केली जाणार नाही.त्याला संविधानिक उत्तर दिलं जाईल, तुमच्या बापाचे रस्ते आहेत का बे? शेताला शेत असलं तरी वाट द्यावी लागेल. सुरेश धस, जरांगे पाटील हे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक आहेत. मृत व्यक्तीच्या नावावर राजकारण करून मंत्रीपद न मिळाल्याने ते आरोप करत आहेत. मंत्रिपदाची लालसेपोटी ते मोर्चांमध्ये सहभागी ते होत आहेत.
सदावर्ते म्हणाले की, आज पंकजा ताई आणि धनंजय मुंडे मंत्री दिसतात, ही बाबासाहेबांची देण आहे. जरांगे आणि धस तुम्ही सुपारीबाज आहात. मातमच्या जागी तुम्ही शिमग्यासारखं वागत आहात. धस आपण वैयक्तिक आयुष्यावर बोलू नये. आम्ही धस आणि पावशेरचे चालू देणार नाही.
सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत सदावर्ते म्हणाले की, हा देश मुगली नाही. ग्राम पंचायत बंद केल्याचा इशारा दिला तर सांगतो ते सरपंच बडतर्फ होतील, ते लोकसेवक आहेत. जे जे ग्रामपंचायत बंद करतील त्यांच्यावर बडतर्फची कारवाई करू. ही लोकसेवेची संविधानिक पदं आहेत. ती माज करण्यासाठी नाही. त्यामुळे ग्रामपंचायत बंद करू देणार नाही. मी न्यायालयात जाईल आणि डंके की चोट पे टाळे खोलू.
Guaratna Sadavarte’s attack on Jarange
-
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली