विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरात ऑनर किलिंगची घटना घडली आहे. एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याने चुलत भावाने बहिणीला खवड्या डोंगरावरून खाली ढकलून दिले. यामध्ये अल्पवयीन तरुणीचा मृत्यू झाला.
नम्रता शेरकर या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर ऋषिकेश शेरकर वय वर्ष 25 असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णाचंद्र शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाशी प्रेमसंबंध असलेल्या बहिणीला समज देऊन सुद्धा ऐकत नसल्याने नम्रताचा चुलत भाऊ ऋषिकेश रागावलेला होता.
मृत तरुणी ही १७ वर्ष २ महिन्याची होती. ही अंबड तालुक्यातील एका गावात आपल्या आई वडिलांसह राहत होती. ती १२ वीत शिक्षण घेत होती. तिचे गावाकडे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण होते. दरम्यान काही दिवसापूर्वी ती घर सोडून गेली होती. यामुळे घरच्यांनी पाच -सहा दिवसापूर्वी नम्रताला वळदगाव येथे राहणाऱ्या चुलत्याकडे पाठवले होते. सोमवारी नम्रताचा चुलत भाऊ ऋषीकेश नमृताला बाहेरून जाऊन येवू, असे म्हणून तो तिला खवड्या डोंगरावर घेऊन गेला. याठिकाणी तिच्यासोबत गप्पा मारता-मारता ऋषिकेश याने नम्रताला डोंगरावरून खाली ढकलून दिले. जवळपास २०० फुटावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
नम्रता शेरकर व तिचा प्रियकर वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघेही गावातून पळून गेले होते. त्यांना शोधून आणून कुटुंबियांनी नम्रताची समजूत घातली होती. मात्र नम्रता ऐकत नसल्याने घरच्यांनी तिला वळदगाव येथे तिच्या चुलत्याकडे पाठविले.
Honor killing in Chhatrapati Sambhajinagar
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली