विशेष प्रतिनिधी
बीड : Manoj Jarange महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे मराठा आरक्षणाविषयी येणाऱ्या 25 तारखेपर्यंत काय निर्णय घेतात याकडे आमचे लक्ष लागले आहे. 25 जानेवारीपासून आम्ही परत आमरण उपोषण करणार आहोत. असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार असल्याचेही ते म्हणाले.Manoj Jarange
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बरेचसे आरोपी अद्याप फरार आहेत . सर्व आरोपींना अटक होऊन संपूर्ण कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. वाल्मिक कराडला अटक झाली आहे. आता पुढच्या काळात मोठमोठे मासे सापडतील. आरोपींना अटक न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचे ते म्हणाले. पोलीस यामध्ये कोणालाच सोडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहभागाबाबत ते म्हणाले, चौकशी सुरु आहे. संबंध आहे की नाही हे सिद्ध होईलच.यामध्ये जे जे येतील त्यांना सु्ट्टी दिली तर महाराष्ट्र बंद पाडणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे मराठा आरक्षणाविषयी येणाऱ्या 25 तारखेपर्यंत काय निर्णय घेतात याकडे आमचे लक्ष लागले आहे. 25 जानेवारीपासून आम्ही परत आमरण उपोषण करणार आहोत. तेव्हाही सरकारने मध्ये हेच होते आता फक्त खांदे बदलले आहेत, असे जरांगे म्हणाले. सोमनाथ सू्र्यवंशी यांच्या मृत्याबाबत ते म्हणाले, एका लेकराचा जीव गेला आहे, न्याय मिळाला नाही तर समाधानी असण्याचे कारण नाही.
If it don’t happen Marathas will be on the streets, warns Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट