विशेष प्रतिनिधी
ठाणे : हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नकली आवाजातील व्हिडिओ करण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते, तर कोणी कुठे गेले नसते, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, आमदार शरद सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते. या प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde म्हणाले की, “
शिंदे म्हणाले की, “मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता पण मला लोकांनी हलक्यात घेतले. त्यानंतर जे घडले त्याची देशाने नाही तर जगातील 33 देशांनी दखल घेतली. एक सामान्य कार्यकर्ता काय करु शकतो हे जगाने पाहिले. शिवसेनेकडून 80 पैकी 60 आमदार निवडून आले आणि खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललो आहे. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्याला बळ देणारे आपण आहोत. कपडे सांभाळणारे नाहीत.
खुर्चीसाठी 2019 मध्ये ज्यांनी मोह केला त्यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला. आपल्याला खुर्चीचा मोह नाही महाराष्ट्राला पुढे न्यायचे हा एकच ध्यास आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झाला आहे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde म्हणाले.
शिंदे म्हणाले की, “रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण उचलला आणि भगवा हाती घेतला. रवींद्र धंगेकर हे पुण्यातील लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे. कामातून त्यांनी ओळख निर्माण केली. ते 25 वर्ष नगरसेवक होते. त्यापैकी शिवसेनेचे 10 वर्ष नगरसेवक होते. शिवसेनेत आल्याने आता लोकांना कळेल धंगेकर कोण?
तुमचा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील, असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांना 4 लाख 60 हजार मते मिळाली. यातून तुमचे काम आणि लोकप्रियता दिसून येते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदेनी धंगेकरांचे कौतुक केले.
शिवसेनेत प्रवेश केलेले रवींद्र धंगेकर म्हणाले की, “शिवसेनेचा 10 वर्ष नगरसेवक होतो. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्राने पाहिले. कॉमन मॅन म्हणून शिंदेंनी काम केले, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रवींद्र धंगेकर यांच्यासोबत सुरेश जैन, बाळासाहेब आंबरे, प्रणव धंगेकर, गोपाळ आगरकर, मिलिंद अहेर, अजित ढोकरे, रवींद्र खेडेकर, संजय पासोलकर, सतीश ढगे, राजू नाणेकर आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी प्रवेश केला.
Instead of making a video of Balasaheb Thackeray with a fake voice… Eknath Shinde attacks Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श