विशेष प्रतिनिधी
पुणे: Khadki खडकीतील दारुगोळा कारखान्यातून एका कर्मचाऱ्याने काडतुसे चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुप्तचर यंत्रणेने त्याला पोलिसांच्या मदतीने पकडले. या कर्मचाऱ्याकडून २२ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.Khadki
गणेश वसंतराव बोरुडे (वय ३९, रा. कल्पतरु सोसायटी, खराडी ररस्ता चंदननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत दारुगोळा कारखान्यातील कनिष्ठ अभियंता जयेंद्र कस्तुरी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खडकी येथील दारुगोळा कारखान्यातून काडतुसे चोरून बाहेर नेण्यात येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दारुगोळा कारखान्यातील अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर तातडीने पुढील कारवाई करण्यात आली. खडकी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वेशांतर करून दारूगोळा कारखान्याच्या १२ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा लावला. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी गणेश या प्रवेशव्दारातून बाहेर पडला. पोलीस आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तसेच त्याच्या दुचाकीच्या डिकीची तपासणी करण्यात आली. दुचाकीच्या डिकीत काडतुसे असल्याचे आढळले. पोलिसांनी या दुचाकीच्या डिकीतून २२ काडतुसे जप्त केली.
भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये आरोपी गणेश बोरुडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.
आरोपी गणेश बोरुडे याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत तो काडतुसे चोरून बाहेर नेत असल्याचे उघडकीस आले .
Intelligence agencies lay a trap and caught the theft of cartridges from an ammunition factory in Khadki
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला