विशेष प्रतिनिधी
नाशिक : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयाच्या निकालावर संशय घेणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मुर्खपणा असून, विरोधक राजकीय षडयंत्र रचत आहेत,” असे त्यांनी ठणकावले. विरोधक आणि माध्यमांकडून सातत्याने त्याच विषयावर चर्चा केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
बनावट कागदपत्रे सादर करून सदनिका मिळविल्याप्रकरणी न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र माणिकराव कोकाटे यांना ट्रायल कोर्टाने दिलासा देताना महत्वाची टिपण्णी केली होती. माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते. अपात्र झाले असते तर पोटनिवडणुक घ्यावी लागली असती, आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता.
खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला ट्रायल कोर्टाने स्थगिती दिली.या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी १८ मार्च रोजी उच्च न्यायालयामध्ये पहिली सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर विरोधकांना सुनावताना कोकाटे म्हणाले, निकाल अद्याप लागलेला नाही, स्थागिती देण्यात आली आहे.
विरोधक, मिडीयाकडून तेच तेच सुरू आहे. न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मुर्खपणा असून, राजकीय षडयंत्र विरोधकांकडून सुरु शेतजमीन घट आणि विकास प्रकल्प यावर कोकाटे यांनी सांगितले की, “रस्ते, पाटबंधारे, मार्केट कमिटी यांसारख्या प्रकल्पांसाठी जमीन लागतेच. त्यामुळे विकासासोबत जमीन कमी होणे साहजिक आहे. समृद्धी महामार्ग आणि अन्य महत्वाकांक्षी प्रकल्प थांबवणे शक्य नाही.
बोगस औषध तक्रारींवर उपाय म्हणून नवीन तंत्रज्ञान आणल्याचे त्यांनी सांगितले. “दोन कोटी रुपयांच्या मशीनमुळे औषध बोगस आहे की नाही, हे तत्काळ समजू शकते,” अशी माहिती त्यांनी दिली.
अजित पवार मुख्यमंत्री होणार का? यावर कोकाटे म्हणाले, आमचीही तीच अपेक्षा आहे की अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत. आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहोत.
It is foolish to doubt the court’s verdict, Manikrao Kokate’s counterattack
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!