salman khan अभिनेता सलमान खान बनला ब्रँड ॲम्बेसेडर.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : salman khan खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाने (KKFI) भारतीय सुपरस्टार सलमान खानला पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. ही स्पर्धा 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षण शिबिरात याची घोषणा करण्यात आली, ज्यात KKFI अध्यक्ष सुधांशू मित्तल, सरचिटणीस एमएस त्यागी, भारतीय पुरुष आणि महिला खेळाडू, प्रशिक्षक आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
पहिल्या खो-खो विश्वचषकात 24 देशांतील 21 पुरुष आणि 20 महिला संघ सहभागी होणार आहेत. खेळाडूंचे कौशल्य आणि खेळाचा थरार या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. प्रशिक्षण शिबिरात आयोजित डेमो सामन्यात भारतातील नामवंत खेळाडू सहभागी झाले होते ज्यात प्रतीक वाईकर, आदित्य गणपुले, रामजी कश्यप, प्रियंका इंगळे, मीनू, नसरीन आदींचा समावेश होता.
KKFI चे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी सांगितले की, या स्पर्धेतील पहिला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. मात्र, पाकिस्तानच्या व्हिसाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे तो संघ भारतात कधी येणार हे सांगणे कठीण आहे. त्यामुळेच खो-खोचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. ते म्हणाले की, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने, खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (KKFI) च्या भागीदारीत या स्पर्धेला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.