विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच 182 मीटर उंचीचा पुतळा उभारणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली.
राज्य सरकारकडून दरवर्षी ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार देण्यात येतो. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. राम सुतार यांचं वय 100 वर्ष आहे, आणि आजही ते शिल्प तयार करतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहात दिली. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राम सुतार यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार आहेत. इ.स.1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे यांचा जन्म झाला. देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्पे तयार केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या देशातील सर्वात उंच शिल्प पुतळ्याचे कामही त्यांनीच केले आहे.
राम सुतार यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या चाळीस वर्षात पन्नासहून अधिक भव्य शिल्पे तयार केली आहेत. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जेजे स्कूल ऑफ ओरिएंटमधून राम सुतार यांनी आपले शिक्षण पूर्ण केले असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत त्यांनी वेरूळ गुंफांमध्ये काम केले. त्यानंतर, काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा शिल्पकला व्यवसाय सुरू केला. 1952 मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यांचा एकुलता एक मुलगा अनिल सुतार हे देखील एक शिल्पकार आहेत आणि त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत पुतळ्याच्या डिझाइनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे
स्टॅच्यू ऑफ युनिटी : राम सुतार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच 182 मीटर पुतळा उभारला. गुजरात राज्यातील केवडिया येथे हा पुतळा दिमाखात उभा आहे.
महात्मा गांधींचे पुतळे : देशभरातच नाही तर जगभरात त्यांनी महात्मा गांधी यांचे शिल्प साकारले आहेत. बुद्ध, महावीर : भगवान बुद्ध, महावीर आणि विवेकानंद यांच्यासह इतर महान विभूतींच्या मूर्ती अत्यंत सुबक आणि चित्तवेधक आहे. त्या पाहताना मनुष्य त्या कलाकृतीत हरवून, हरखून जाते.
त्यांच्या कलाकृतीमध्ये मुख्यत: इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. त्यांच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृती, इतिहासाचा आणि भावनेचा अनोखा मिलाफ दिसून येतो.
Maharashtra Bhushan Award to Senior Sculptor Ram Sutar
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार