विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा देण्याची याेजना सुरू केली आहे. या याेजनेत भ्रष्टाचार झाल्याची प्रकरणेही पुढे आली आहेत. आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीच या याेजनेवर भाष्ट केले आहे. एक रूपयांत पीकविमा योजनेत खूप लोकांनी आम्हाला चूना लावला आहे, असे अजित पवार म्हणाले,
दिशा कृषी उन्नतीची @2029 या कार्यक्रमांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अजित पवार हे बोलत होते. ते म्हणाले, “आम्ही 1 रूपयांत पीकविमा द्यायचे चालू केले होते. ती योजना अडचणीत आली आहे. त्या योजनेत खूप लोकांनी आम्हाला चूना लावला आहे. ही माहिती आम्ही काढली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या भल्याचे आता काम करणार आहोत. धरणे झाली, तर आपल्याला पाणी मिळणार आहे. पाणी मिळाले तर शेती करता येणार आहे. हे सगळे एकमेकांवर अवलंबून असणारे चित्र आहे.
शेतकऱ्यांना आवाहन करताना अजित पवार म्हणाले, जग झपाट्याने बदलत आहे. शेतीक्षेत्र सुद्धा बदलत आहे. बदलत्या काळानुसार शेतीला कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिकची जोड देणे ही गरज आहे. शाश्वत विकासासाठी शेतीत संशोधन होणे गरजेचे आहे. मात्र हवामान, आतंरराष्ट्रीय परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे आधीच आव्हानात्मक असलेल्या अनेक अडचणी कृषीक्षेत्रासमोर आहेत. त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. माझ्या शेतकऱ्यांच्या मनात ‘मी माझे जीवन संपवतोय,’ ‘मी आता संसार, मुला-बाळांना सोडून आत्महत्या करतोय,’ ही भावना अजिबात येता कामा नये. त्यापद्धतीने आपल्याला पुढे जायचे आहे. त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. तुम्ही खचू नका, नाउमेद होऊ नका, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे.
Many people have been fooled us , Ajit Pawar’s statement on the insurance scheme for one rupee
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत