Chandrakant Patil: मंत्री चंद्रकांतदादा पाटील सूस घनकचरा प्रकल्पावरून संतप्त, आंदोलनाचा इशारा

Chandrakant Patil: मंत्री चंद्रकांतदादा पाटील सूस घनकचरा प्रकल्पावरून संतप्त, आंदोलनाचा इशारा

Chandrakant Patil

विशेष प्रतिनिधी

Pune News: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) सूस घनकचरा प्रकल्पावरुन आक्रमक झाले. पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची झाडाझडती घेत, आजच प्रकल्प बंद न झाल्यास, उद्या या प्रकल्पाविरोधात खूर्ची टाकून बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असे म्हणत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

सूस रस्त्यावरील ओल्या कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प बंद करण्याची सातत्याने मागणी होत आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करुन नांदे-चांदे येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जानेवारी २०२४ मध्ये झाला होता. त्याअनुषंगाने चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्या सोबत आज बैठक झाली. या बैठकीत पाटील यांनी सदर प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीत अद्याप सदर प्रकल्प स्थलांतरित का झाला नाही? असा प्रश्न ना. पाटील यांनी उपायुक्त संदीप कदम यांना विचारला. त्यावर कदम यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे महापालिकेकडून कोणतीच कारवाई झालेली नसल्याने, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

तसेच, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधून महापालिकेच्या भोंगळ काराभाराप्रति निषेध व्यक्त केला. त्याशिवाय महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांना सदर प्रकल्प आजच बंद झाला नाही; तर उद्या प्रकल्पाविरोधात बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला.

Minister Chandrakant Patil angry over Sus solid waste project, warns of agitation

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023