Vishal Patil : खासदार विशाल पाटील थेटच म्हणाले, भविष्यात मी काँग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात

Vishal Patil : खासदार विशाल पाटील थेटच म्हणाले, भविष्यात मी काँग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात

विशेष प्रतिनिधी

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले अपक्ष खासदार विशाल पाटील हे काँग्रेसचे शंभरावे खासदार असल्याचे सांगितले जाते. पण भविष्यात आपण काँग्रेस नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाऊ असे पाटील यांनी थेटच सांगितले आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली होती. विशाल पाटील काँग्रेसकडून इच्छुक असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांना तिकीट दिले होते. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विश्वजित पाटील यांच्यासह, महाविकास आघाडी म्हणून चंद्रहार पाटील यांच्या स्टेजवर हजेरी लावली. परंतु, आतून विशाल पाटील यांच्यासाठी जिवाचे रान केले. घडले तसेच, चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला आणि विशाल पाटील निवडून आले. एकप्रकारे ‘सांगलीचे वाघ आम्हीच आहोत,’ असे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी दाखवून दिले होते.

मात्र आता विशाल पाटील यांनी काँग्रेसलाच कात्रजचा घाट दाखवण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हस्ते पार पडले. यावेळी विशाल पाटील उपस्थित होते.

विशाल पाटील म्हणाले, “मंत्री जयकुमार गोरे हे सांगलीचे जावई आहेत. आमच्यावर शेजारी गोरेंची सासरवाडी आहे. गोरे पण प्रथम अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मी पण प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलोय. भविष्यात मी काँग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईल. जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल, अशी आशा आहे. आम्ही पण पुढे जावे, अशी आशा आहे.

MP Vishal Patil directly said, in future I will either be with Congress or some other party.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023