विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२५ साठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विविध संवर्गातील एकूण ३८५ जागा आहेत. पूर्व परीक्षा २०२५ ही २८ सप्टेंबरला होणार आहे. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करत आहेत.
आयोगाने यंदा २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी मुंबई, पुणे, नागपूर अशा विविध शहरांमध्ये राज्यसेवा परीक्षेची नव्या पद्धतीनुसार तयारी करत आहे. आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार राज्यसेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यात येणे अपेक्षित होते.
विभागनिहाय जागाही जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागात १२७, महसूल व वन विभाग १४४, सार्वजनिक बांधकाम विभाग- स्थापत्य अभियांत्रिकी सेवेसाठी ११४ जागा आहेत.
अर्ज करण्याचा कालावधी २८ मार्च ते १७ एप्रिल असा आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याचा दिनांक १७ एप्रिल असून चलानद्वारे शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक २१ एप्रिल आहे.
MPSC preliminary exam released, exam for 385 seats on September 28
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप